जम्मू-काश्‍मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान

 जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.

Updated: Dec 14, 2014, 07:26 PM IST
जम्मू-काश्‍मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान title=

श्रीनगर/ रांची :  जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.

जम्मू-काश्‍मिर आणि झारखंड विधानसभेसाठी रविवारी चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. दहशतवादी हल्ल्याचे सावट तसेच खराब वातावरणातही मतदारांनी मतदानासाठी प्रतिसाद दिला. 

दरम्यान जम्मू-काश्‍मिरमधील डोरु परिसरात मतदानादरम्यान पीडीपी आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामरी झाली. मात्र वेळीच पोलिसांनी ताबा मिळवत परिस्थिती नियंत्रणात राखली.  झारखंडमध्येही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.