पुढील वर्षी रेल्वे भाडं महागण्याची शक्यता

पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच रेल्वेचा प्रवास महाग होण्याची शकत्या आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५च्या फेब्रूवारी महिन्यातील होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये उर्जेच्या दराचा खर्च भरून काढण्यासाठी हा खर्च रेल्वे प्रवाशांकडून भरून काढला जाण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 14, 2014, 04:24 PM IST
पुढील वर्षी रेल्वे भाडं महागण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच रेल्वेचा प्रवास महाग होण्याची शकत्या आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५च्या फेब्रूवारी महिन्यातील होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये उर्जेच्या दराचा खर्च भरून काढण्यासाठी हा खर्च रेल्वे प्रवाशांकडून भरून काढला जाण्याची शक्यता आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सागितलं की, इंधन समायोजनाच्या दराबाबतीतील संशोधन डिसेंबर मध्येच झालं पाहिजे. त्याचाच परिणाम फेब्रुवारीतील बजेटवर होऊ शकतो.

ते पुढं म्हणाले, रेल्वेला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे आणि त्यासाठी निधी उपलब्ध होत नाहीय. हा पूर्ण प्रकल्प करण्यासाठी सहा ते आठ कोटींची गरज आहे. हा सगळा भार उचलण्यासाठीच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हे पाऊल उचललं असल्याचंही ते म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.