2 क्रिकेट खेळाडूंकडून अरुण जेटलींचं समर्थन

डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप होत असतानाच आता माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही या वादात उडी घेतली आहे. विरेंद्र सेहवाग याने ट्विट करत अरुण जेटली यांचं समर्थन केलं आहे.

Updated: Dec 20, 2015, 11:37 PM IST
2 क्रिकेट खेळाडूंकडून अरुण जेटलींचं समर्थन title=

नवी दिल्ली : डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप होत असतानाच आता माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही या वादात उडी घेतली आहे. विरेंद्र सेहवाग याने ट्विट करत अरुण जेटली यांचं समर्थन केलं आहे.

विरेंद्र सेहवाग याने ट्विट केल्यानंतर गौतम गंभीर याने ही सेहवागचे ट्विट रिट्विट करून अप्रत्यक्षपणे अरुण जेटली यांचं समर्थन केलं आहे.

सेहवागने ट्विट केलं आहे की, जेव्हा मी डीडीसीएमध्ये होतो तेव्हा कोणताही चकीत करणारी निवड व्हायची त्यावेळेस मला फक्त जेटलीनांच सांगावं लागत होतं. त्यानंतर ते लगेचच ती गोष्ट सुधरवत योग्य खेळाडूसोबत न्याय करायचे.'