नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करत जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारतानकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पाकिस्तानचे 15 जवान ठार करण्यात आलेत, अशी माहिती बीएसएफने आज दिली.
आज सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार उखळी तोफांचा मारा केला जात होता. कठुआ, सांबा, अखनूर सेक्टरमध्ये रात्रभर तर नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी पहाटे पाचपासून गोळीबार करण्यात येत होता. परंतु पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
We are not yet confirmed about the number of causalities on the other side, but approx 15 Pak army men have died: Arun Kumar (ADG, BSF) pic.twitter.com/YeJjn3pDtc
— ANI (@ANI_news) October 28, 2016
भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी रेंजर्सचे सुमारे १५ जवान ठार झाल्याचा दावा बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक अरूण कुमार यांनी केलाय. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या शक्करगढ भागात पाकिस्तानी रेंजर्सच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या.
दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर आणखी गोळीबाराची शक्यता गृहीत धरून भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा दिलाय. आम्ही कधीच नागरी वस्तीवर हल्ला करत नाही. पण जर पाकिस्तानने पहिल्यांदा आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्याला नक्कीच प्रत्युत्तर देणार, असा इशारा बीएसएफने दिलाय.