नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर यूपीए सरकारला सर्जिकल स्टाईकचा सल्ला दिला होता मात्र यूपीए सरकानं तो टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केलाय.
मेनन यांनी लिहिलेल्या 'चॉइसेस: इनसाईड द मेकिंक ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी' या पुस्तकात त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. नुकतंच हे पुस्तक ब्रिटनमध्ये प्रकाशित करण्यात आलं.
या पुस्तकात त्यांनी अनेक खुलासे केलेत. २६/११ हल्ल्यानंतर कारवाई केली पाहिजे. भले ही कारवाई पाकिस्तानच्या पंजाबस्थित मुरिदके प्रांतातील लष्कर ए तोयबाविरुद्ध केली जावी अथवा पाकव्याप्त काश्मीरमधील लष्करी कँपवर अथवा आयसिसविरोधात कारवाई व्हावी असे मेनन यांनी यूपीए सरकारला सांगितले होते. मात्र यूपीए सरकानं तो सल्ला टाळला, असे मेनन यांनी पुस्तकात म्हटलंय.