पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट

नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे.

Updated: Dec 8, 2016, 06:26 PM IST
पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट  title=

नवी दिल्ली : नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. डिजीटल पेमेंटनं व्यवहार केल्यास मोठ्याप्रमाणावर सवलतीची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटलींनी केली आहे. डिजीटल पेमेंटनं पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास 0.5 टक्के एवढी सवलत ग्राहकांना मिळणार आहे.

पाहा आणखी कशावर मिळणार डिस्काऊंट

- टोलनाक्यांवर ऑनलाइन टोल भरणाऱ्यांना 10 टक्के सवलत

- डिजिटल माध्यमातून पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना 0.75 टक्के सवलत

- नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण आणि सहकारी बॅंकांचे खातेदार असलेल्या आणि किसान कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना रूपी कार्ड देणार

- रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पास डिजिटल माध्यमातून खरेदी केल्यास मिळणार 0.5 टक्के सवलत

- एलआयसीच्या ऑनलाइन पेमेंटवर 8 टक्के डिस्काऊंट, जीआयसीच्या ऑनलाइन पेमेंटवर 10 टक्के डिस्काऊंट