आजही एकट्या धोनीवर भारताची मदार?

एक गोष्ट नक्की की, एकट्या धोनीच्या जिवावर टीम इंडियाचं नशिब बदलू शकत नाही. टीम इंडियाला सीरिजमध्ये कमबॅक करायचं असल्यास सर्व बॅट्समन्सना धोनीसारखा खेळ करावा लागणार आहे आणि याची सुरूवात कोलकाता वन-डेपासून करावी लागेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 3, 2013, 08:54 AM IST

www.24taas.com, कोलकाता
एक गोष्ट नक्की की, एकट्या धोनीच्या जिवावर टीम इंडियाचं नशिब बदलू शकत नाही. टीम इंडियाला सीरिजमध्ये कमबॅक करायचं असल्यास सर्व बॅट्समन्सना धोनीसारखा खेळ करावा लागणार आहे आणि याची सुरूवात कोलकाता वन-डेपासून करावी लागेल.
नव्या वर्षात वीरू हल्लाबोल करणार का? २०१३मध्ये गौतम 'गंभीर' होणार का? नव्या वर्षात रोहितला अखेरची संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेत. पण, टीम इंडियाच्या प्रत्येक पराभवाला कारणं देण्यात कॅप्टन धोनीचा हात कोणीच पकडू शकत नाही. धोनीने कितीही कारणं दिली तरी टीम इंडियाच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होण्याची काही चिन्ह दिसत नाही. प्रश्न हा आहे की नव्या वर्षात तरी टॉप ऑर्डरचा परफॉर्मन्स आणि कॅप्टनच्या भूमिकेत बदल होईल का?
२०१२ च्या शेवटच्या मॅचमध्ये कॅप्टन कूलने केलेल्या मेहनत वाय गेली. चेन्नईमध्ये ज्या पीचवर धोनीने सेंच्युरी झळकावली त्या पीचवर भारताची निम्मी टीम केवळ २९ रन्सवर पॅव्हिलियनमध्ये परतली होती. आता टीम इंडियात बदल करण्याची आवश्यकता आहे. टीम इंडियाच्या टॉप पाच बॅट्समन्सच्या गेल्या ५ वन-डेतील परफॉर्मन्सवर एक नजर टाकली तर लक्षात येईल की सर्वात वाईट कामगिरी कोणाची आहे ते. ही आकडेवारी मिळवण्याकरता किंवा समजण्याकरता धोनीला कोणत्याही एक्सपर्टची गरज पडणार नाही.

नव्या वर्षात धोनीच्या प्लानिंगमध्ये बदल झालेत की नाही याची झलक कोलकाता वन-डेत पाहायला मिळेलच. कारण टीम इंडियाची स्थिती सुधारण्याकरता टीममध्ये रोहितऐवजी अजिंक्य रहाणेला संधी देण्याची गरज असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय.