नाते-संबंधांना टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतात योगासनं

आजपर्यंत तुम्ही योगासनांचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आपले नातेसंबंध टिकविण्यासाठीही योगासनांचा खूप फायदा होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 21, 2014, 10:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजपर्यंत तुम्ही योगासनांचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आपले नातेसंबंध टिकविण्यासाठीही योगासनांचा खूप फायदा होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीला योगासनांमुळे मानसिकरित्या आणि भावनिकरित्या खूप फायदा होतो... आणि त्यामुळेच आपले नातेसंबंध सुधारण्यात ही प्रक्रिया खूपच फायदेशीर ठरते. योगा केल्यामुळे आपलं डोकं शांत राहतं आणि त्यामुळेच आपण एखाद्या गोष्टीचा सर्वांगिण विचार करू शकतो. चला तर पाहुयात, योगामुळे कसे सुधारतात आपले नातेसंबंध...
डोक्याला शांतता
एखाद्या रागीट नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरोबर राहणं खूपच कठिण ठरतं. आपल्या मेंदूत घुसळण होते, तेव्हा आपल्याला खूप राग येतो. योगासनांमुळे आपला मेंदू शांत राहतो. त्यामुळे मूडही आनंदात राहतो.. आणि राग कमी होतो. योगासनं कायम करत असाल तर तुमची राग करण्याची सवयही संपुष्टात येते.
भावनांवर नियंत्रण
आपल्या मनात अनेक भावना निर्माण होत असतात. पण, प्रत्येकवेळी त्या समोरच्या व्यक्तीवर उघडपणे व्यक्त करणं शक्य नसतं. आपले नातेसंबंध टिकून राहण्यासाठी काही वेळा आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं. योगामुळे आपल्या मनाला आपल्या भावनांवर नियंत्रण करण्यासाठी शक्ती मिळते. त्यामुळे, भावनांच्या आहारी न जाता योग्यवेळी योग्य निर्णय आपण घेऊ शकतो.
हसत-खेळत-बागडत राहणं
योगा फक्त मेंदूलाच नाही तर शरीरालाही फायदेशीर ठरतो. आपल्या हृदयासोबत आपल्या शरीराला एक नवी ऊर्जा देण्यासाठी योगासनं महत्त्वाचं काम करतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ अॅक्टीव्ह राहू शकतो. कोणत्याही नातेसंबंधांना खूश ठेवण्यासाठी तुमचं आनंदी राहणं खूप महत्त्वाचं ठरतं.
रोमान्समध्येही फायदा
योगासनांमुळे शरीरामध्ये लवचिकता आणि सक्रियता निर्माण होते. यामुळे रोमान्सच्या वेळी तुम्ही तुमच्या पार्टनरलाही आनंदी ठेवू शकता. त्यामुळे तुमचे नातेसंबंध जास्त ताणले जाणार नाहीत.
सकारात्मक विचार
आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपलं अनेकांसोबत वाद-विवाद होऊ शकतात. योगासनांमुळे आपल्या विचारांत सकारात्मक बदल लगेच दिसून येतात. यामुळे वाद-विवाद टाळता येऊ शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.