मुंबई : कोणता पुरुष कसा आहे याबाबत महिलांना लगेच कळतं. पण कधी-कधी पुरुषांबाबतीत महिला काही गोष्टी तपासून पाहत नाहीत आणि मग नंतर त्यांच्यासाठी त्रासदायक स्थिती निर्माण होते. पण कोणत्या पुरुषांपासून लांब राहवं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. अतिकामी पुरुष - कामवासना बाळगणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहावे. स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणे किंवा ज्याचे चारित्र्य संशयास्पद असेल अशा पुरुषांपासून स्त्रियांनी दुरच राहावं. कामवश पुरुषांची विचार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते त्यामुळे अशा पुरुषांपासून लांब राहणे कधीही चांगले.
2. मूर्ख पुरुष - एखादा पुरुष मूर्ख आहे हे तुम्ही कसे ओळखाल. मूर्ख व्यक्ती नेहमी अडचणी वाढवणारे काम करत राहतो. अशा लोकांना कोणत्या परिस्थितीमध्ये काय करावे या गोष्टीची काहीच समज नसते. यामुळे स्त्रिया अडचणीत येऊ शकतात. अशा मुर्ख पुरुषांपासून लांबच राहा.
3. स्वार्थी पुरुष - आत्मसंतुष्टी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या, आपल्या नातेवाईकांशी काहीच देणघेणं नाही असं समजणारा किंवा दुसऱ्याचा कधीच विचार न करणाऱ्या स्वार्थी पुरुषापासून लांब राहा. अशा लोकांच्या मनात संवेदना नसतात. असे व्यक्ती विश्वासपात्र नसतात.
4. निंदा करणारा - विनाकारण कोणाचीही निंदा करणाऱ्या व्यक्तीची संगत करणेही योग्य नाही. ज्याला इतरांमध्ये नेहमी कमतरता दिसतात, जो इतरांच्या चांगल्या कामामध्येसुद्धा चुका शोधतो अशा व्यक्तीपासून दुर राहा.
5. जास्त रागीट पुरुष - ज्या पुरुषाला खूपच राग येतो अशा पुरुषापासून लांब राहा. क्रोध हा मनुष्याच्या सर्वात मोठा शत्रू आहे. रागामध्ये पुरुष काहीही करतो. अशा पुरुषांचं स्वत:वर नियंत्रण नसतं. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तीपासून लांब राहा.