मुंबई : डिहाइड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे, उन्हाळा सुरू झाला की ही अडचण येणे सुरू होते, मात्र हिवाळ्यातही लोक याला शिकार पडतात, यामुळे फक्त थंडी वाजते असं नाही, तर थकणं, डोकं दुखणं, नसा आखडणं सारखा त्रास होऊ शकतो.
काही लोकांना तहाण लागत नाही, काहींना पाणी पिणं आवडत नाही, हिवाळ्यात काही लोक तर असं सांगतात की, पाणी प्यावसं वाटतच नाही. जर या तक्रारी तुमच्या असतील तर सावध रहा. डिहायड्रेशनची अडचणी हिवाळ्यातही येऊ शकते.
वातावरण थंड असल्याने तहाण कमी लागते. घामही अशावेळी कमी येतो, मात्र कमी पाणी पिणे आणि जास्त चहा आणि कॉफीचं सेवन करणे डिहायड्रेशनच्या अडचण वाढवते. जास्तवेळ हिटर लावून घरात बसून राहणे देखील, शरीरासाठी चांगलं नाही.
जर तुमच्या शरीरात दोन-तृतीयांश पाणी असतं, तर १.५ टक्के कमतरता आल्याने माइल्ड डिहायड्रेशन होतं. पाण्याची पातळी 3-8 टक्के कमी झाली, तर शरीरातील कार्यप्रणाली बिघडते, आणि त्याचा नकारात्मक प्रभाव पडता.
पाणी कमी झाल्याने तोंडाचा वास येतो, लाळेत अॅण्टीबॅक्टेरीयल गुण असतात, यात शरीरातील पाणी कमी होतं, तोंडात लाळ कमी झाल्याने, बॅक्टेरिया वाढतात, आणि तोंडाला दुर्गंधी येते.