वॉशिंग्टन: सावधान.... जेवणामध्ये "अ" जीवनसत्व पुरेशा प्रमाणात न घेणाऱ्या लहान मुलांना पोटाचे आणि श्वसनाचे विकार होऊ शकतात असे मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विश्वविद्यालय आणि मिशिगन स्टेट यूनिवर्सिटी संशोधकांनी सांगितले आहे.
या संशोधनासाठी अमेरिकेच्या ५-७ वर्षाच्या २८०० मुलांवर वर्षभर अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असे आढळले की ज्या मुलांमध्ये व्हिटॅमिन "ए"ची कमतरता असते त्यांना उल्टी, पोटदुखी, ताप यांसारख्या आजारांना सामोरं जाव लागतं.