मुंबई : एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो.
नव्या अपत्याला पाहण्यासाठी आई-वडील आतूर झालेले असतात... पण, अनेकदा होणारी आई 'प्रसूतीकळां'ना घाबरलेल्या अवस्थेत असते. त्यामुळे, या नव्या अपत्याचा जन्म कोणत्या पद्धतीनं होणार हा प्रश्न तिला सतावत असतो.
आत्तापर्यंत साधारण डिलिव्हरी, सिझेरियन डिलेव्हरी, सिझेरियननंतर व्हेजिनल बर्थ डिलिव्हरी आणि फोरसेप्स डिलिव्हरी (काही साहित्य वापरून बाळाला बाहेर काढणं) या चार पद्धती प्रचलित होत्या...
परंतु, आता मात्र जेन्टल सिझेरियन किंवा नॅचरल सिझेरियन ही पद्धत चांगलीच लोकप्रिय झालीय. चाईल्डबर्थ एज्युकेटर सोफिया यांनी ही पद्धत काय असते हे दर्शवणारा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलाय... आणि हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय होतोय...
या व्हिडिओमध्ये नवजात बालक स्वत:च आईच्या पोटातून बाहेर येताना दिसतंय. डॉक्टरांनी सिझेरियन पद्धतीनं आईच्या पोटाला केलेल्या छेदातून हे बाळ अलगद बाहेर येताना दिसतंय... हा व्हिडिओ आत्तापर्यंत १.६ दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेलाय.