आपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स!

 आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.

Updated: Feb 16, 2015, 10:15 AM IST
आपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स! title=

मुंबई:  आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.

१. अपचनाचा त्रास दूर करायचा असेल तर कांद्याच्या तुकड्यावर लिंबाचा थोडा रस पिळा. जेवणाबरोबर कांद्याचा हा तुकडा खा.
२. स्वेटर कपाटात ठेवताना तो वर्तमानपत्रात लपेटून ठेवा. यामुळे तो खराब होत नाही.
३. लोण्यापासून तूप बनवताना त्यात मेथीचे थोडे दाणे टाका. तुपाला वेगळाच मस्त सुगंध येईल.
४. तांदूळ मोठ्या प्रमाणावर खरेदी केलाय? काही हरकत नाही. त्यात सुकविलेली अख्खी लाल मिरची टाका. मुळीच खराब होणार नाही.
५. हॉटेलसारखा स्वादिष्ट नान, पराठा, रोटी घरच्या घरीच खायचीय? पीठ मळताना त्यात पाण्याबरोबर थोडा सोडाही मिसळा.
७. थर्मास बराच काळ तसाच ठेवायचा असल्यास त्यात थोडी साखर घालून ठेवा. यामुळे त्यात कुबट वास येणार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.