मुंबई : केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही आपण गोरे दिसावे असे वाटते. ज्याप्रमाणे चेहरा उजळण्यासाठी मुलींसाठी बाजारात अनेक क्रीड प्रॉडक्ट्स मिळतात. त्याचप्रमाणे मुलांसाठीही विशिष्ट प्रॉडक्ट्स आहेत. मात्र या प्रॉ़डक्ट्सचे साईड इफेक्ट होण्याची भिती अधिक आहेत. त्यामुळे खालील उपायांनी तुम्ही तुमचा चेहरा उजळवू शकता.
१. रोज सकाळी आणि संध्याकाळी नेहमी पाण्याने चेहरा अवश्य धुवा. विशेषकरून बाहेरुन आल्यास चेहरा लगेच धुवा. बाजारात अनेक फेसवॉश उपलब्ध असतात. मात्र लिंबू अथवा कोरफडीचा समावेश असलेल्या फेसवॉशचा वापर करा.
२. चेहऱ्याची त्वचा नेहमी स्वच्छ ठेवा. लिंबाचा रस काढून तो चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग तसेच पिपल्स दूर होतील.
३. स्किन प्रॉ़डक्ट्स घेताना योग्य ती काळजी घ्या. यामुळे चेहऱ्याला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
४. बेसन, हळद आणि दूध एकत्र मिक्स करुन याचा लेप चेहऱ्याला लावा. थोडा वेळ ठेवून नंतर धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते.
५. त्वचेचा ओलावा कायम राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.