भूक कंट्रोल करणारे हे ६ पदार्थ

भूक लागल्यास माणसाला काही सुचत नाही. सतत भूक लागल्याने माणूस अधिक खाऊ लागतो. सतत खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. हे आहेत सहा पदार्थ जे खाल्ल्याने तुमची भूक कंट्रोल होऊ शकते. 

Updated: Mar 2, 2016, 12:04 PM IST
भूक कंट्रोल करणारे हे ६ पदार्थ title=

मुंबई : भूक लागल्यास माणसाला काही सुचत नाही. सतत भूक लागल्याने माणूस अधिक खाऊ लागतो. सतत खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. हे आहेत सहा पदार्थ जे खाल्ल्याने तुमची भूक कंट्रोल होऊ शकते. 

नाश्त्यात एक ते दोन अंडी खाल्ल्यास लवकर भूक लागत नाही. अंड्यातील प्रोटीन आणि फॅट शरीराला उर्जा देतात. 

जेवणाआधी एखादं सफरचंद खा. यामुळे कमी जेवण जाईल. सफरचंदामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते. 

ओट्स खाल्ल्याने भूक कंट्रोल होण्यास मदत होते. यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते आणि फॅट कमी होते. 

बदाममध्ये अनसॅच्युरेटेड फॅटची मात्रा अधिक असते. प्रोटीन आणि फायबरयुक्त बदाम पचण्यास अधिक वेळ घेतात. यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच शुगर लेवल नियंत्रणात राहते.

बीन्स, भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, प्रोटीनसह अँटीऑक्सिडंट्स, व्हिटामिन बी आणि आर्यन असते. 

एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यानेही भूक कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. यात पेक्टिन नावाचे फायबर पाचनशक्ती मंदावतो. यामुळे लवकर भूक लागत नाही.