लिंबू रस काढण्याची सहज सोपी पद्धत आणि लिंबाचे फायदे

लिंबू आरोग्यावर्धक आहे. याचे खूप काही लाभ आहेत. 

Updated: Feb 11, 2016, 01:38 PM IST
लिंबू रस काढण्याची सहज सोपी पद्धत आणि लिंबाचे फायदे title=

मुंबई : लिंबू आरोग्यवर्धक आहे. याचे खूप काही लाभ आहेत. लिंबाची चव आंबट-गोड, कडवट असते. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन आदींसह प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असते. (व्हिडिओ बातमीच्या खाली)

लिंबू रस घेण्याचे हे फायदे 

- पहाटे लिंबू पाणी प्यायल्याने पोट साफ होते. 
- लिंबू रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
- लिंबूपाणी सेवनाने उलट्या थांबण्यास मदत होते. 
- लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

- लिंबू रस दोन वेळा घेतला तर शरीराची चरबी कमी होते. 
- लिंबू पाणी नियमित सेवन केल्याने लट्ठपणा कमी होतो. 
- लिंबू पाण्याने नियमितपणे गुळणी केल्याने तोंड आणि दातांचे विकार दूर होतात.
- दुधात लिंबाचा रस मिसळून चेहर्‍यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.

लिंबू रस काढण्याची सहज, सोपी पद्धत