झोपेत घोरणं म्हणजे आजाराचं लक्षण

 अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. अनेक लोकांचं घोरणं एवढं विचित्र असतं की त्यामुळे दुसऱ्यालाही झोप लागत नाही. अनेक लोक घोरण्याच्या समस्येपासून हैराण असतात.

Updated: Jan 12, 2016, 04:26 PM IST
झोपेत घोरणं म्हणजे आजाराचं लक्षण title=

मुंबई :  अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. अनेक लोकांचं घोरणं एवढं विचित्र असतं की त्यामुळे दुसऱ्यालाही झोप लागत नाही. अनेक लोक घोरण्याच्या समस्येपासून हैराण असतात.

झोपेत घोरणे हे एक आजाराचं पण लक्षण असू शकतं. वजन वाढलेल्या व्यक्तीच्या गळ्याजवळ जेव्हा चरबी साचते तेव्हा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि माणून तोंडाने श्वास घेऊ लागतो.

वजन कमी केल्याने घोरणं कमी होऊ शकतं. पाठीवर झोपण्याएवजी अशा वेळेस एका कुशीवर झोपणे फायद्याचं ठरतं. त्यामुळे घशावर दाब येत नाही.

अनेकांना एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असल्यास थंडपणा येतो आणि घोरण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे अॅलर्जीवर उपाय करावा. नाकपुड्या बंद झाल्यानेही घोरण्याची समस्या तयार होते. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

एखादी व्यक्ती जर घोरत असेल तर त्याला उठवा. अशा वेळेस त्यांचा श्वास कोंडला जाऊ शकतो.