मुंबई : बाजारात शरीराची शुद्धी करणारे अनेक ज्यूस अथवा पेये मिळतात; जी साधारणतः खूप महाग असतात. आणि बरेचदा त्यात फसवणूक होण्याचीही शक्यता असते.
पण सहज आणि सर्वत्र मिळणारे एक उत्तम पेय म्हणजे पाणी. हा उपाय अत्यंत स्वस्तही आहे.
सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी एक ग्लास पाणी पिणे खूप लाभदायक ठरु शकते. हे केल्यानंतर ४५ मिनिटं काहीही खाऊ अथवा पिऊ नये. हा उपाय सलग एक महिना करा. ह्याने शरिराची आंतरिक शुद्धी होण्यास मदत होते.
हा खरं तर एक प्राचीन उपाय आहे. चिनी किंवा जपानी संस्कृतीत हा उपाय पूर्वापार केला जात आला आहे.
ह्याने कफ, पित्त किंवा ब्लडप्रेशर यांसारख्या त्रासांवरही थोड्या प्रमाणात मात केली जाऊ शकते. जेवणाच्या आधी आणि नंतर अर्धा तास एक-दोन ग्लास पाणी पिणेही खूप गरजेचे आहे.