मुंबई : उन्हाळ्यात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाण्याला अधिक पसंती असते. मात्र सगळ्यांनाच हे फळ फायदेशीर असते असे नाही. आहारतज्ञांनी याबाबत माहिती दिलीये.
ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतो.
ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी या फळाचे सेवन कमी प्रमाणात करावे. कारण यातील शुगरमुळे शरीरातील साखरेची मात्र वाढते.
अस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपल्या खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कलिंगडाचे सेवन फार कमी प्रमाणात करावे.
किडनीची समस्या असणाऱ्यांनीही कलिंगडाचे अधिक सेवन करु नये. कलिंगडामध्ये खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी बेतानेच कलिंगड खावे.