नवी दिल्ली : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरात, गोवा, बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये सेक्स्युअल वेलनेस उत्पादने सर्वाधिक खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आलीये. 'दॅट्स पर्सनल डॉट कॉम'ने केलेल्या अभ्यासान्वये ही माहिती समोर आलीये.
३० महिन्यांमध्ये आंतरिक ट्रॅफिक, ग्राहकांचे फीडबॅक, विक्रीची संख्या आणि सर्व्हेंच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानंतर ही माहिती समोर आलीय. बिहारमध्ये पुरुषांचे कामोत्तेजनावर्धक उत्पादनांची विक्री एकूण देशातील विक्रीपैकी २३ टक्के होते. तर केरळमध्ये ७६ टक्के कंडोमची विक्री होते.
देशातील अनेक महानगरेही या विक्रीत पुढे आहे. या यादीत मुंबई सर्वात पुढे आहे. २टीयर आणि ३टीयर शहरांमध्येही या उत्पादनांबाबत जागरुकता वाढतेय. २ टीयर शहरांमध्ये जयपूर, सुरत आणि लखनऊंचा समावेश आहे.