न्यूयॉर्क : लोक आपलं वजन कमी कऱण्यासाठी कितीतरी उपाय करत असतात. मात्र वजन कमी कऱण्याच्या या पेक्षा सोपा मार्ग असू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते आरश्यासमोर बसून खाल्ल्याने वजन वाढत नाही.
जेव्हा तुम्ही एखादे जंकफूड आरश्यामोर बसून खात असता तेव्हा आपल्या शरीराला या पदार्थामुळे नुकसान पोहोचतंय असा विचार सतत आपल्या मेंदूत सुरु होतो. त्यामुळे खाल्लेलं अन्नाचा आपण पूर्ण स्वाद घेऊ शकत नाही. तसेच खाल्ल्याने संतुष्टीही मिळत नसल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय.
युनिर्व्हसिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडाच्या वैज्ञानिकांनी १८५ विद्यार्थ्यांवर हा प्रयोग केला. यात आरश्यासमोर बसून खाल्ल्याने वजन वाढत नसल्याचा निष्कर्ष समोर आलाय.
या परीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना चॉकलेट केक आणि फ्रुट सलाडमधील एकाची निवड कऱण्यास सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना आरसा असलेल्या आणि नसलेल्या खोल्यांमध्ये पाठवण्यात आले. अध्ययनानंतर वैज्ञानिकांनी वजन कमी करण्यासाठी किचन अथवा डायनिंग हॉलमध्ये आरसा लावणे फायदेशीर असल्याचा सल्ला दिलाय.