पुरुष महिलांमध्ये काय धुंडाळत असतात...

व्यक्तीचा आणखी एखादा गुणधर्म त्याच व्यक्तीच्या मनात असं काही घर करून जातो की बस... बाकी सगळं बाजूला पडतं आणि ती समोरची व्यक्ती आवडायला लागते. मग, तीच्या गुणांसहीत तिचे दोषही आपलेसे होऊन जातात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 7, 2013, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महिला असो अगर पुरुष... प्रत्येकाची आपली अशी पसंत – नापसंत असते. अर्थात, हेच तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतही असतं. बहुतेकदा आपल्या स्वभावानुसार आपल्याला समोरची व्यक्ती आवडणार की नाही, हेही सांगता येऊ शकतं. म्हणजेच, जास्त बडबड करणाऱ्या किंवा भांडणाऱ्या एखाद्या व्यक्तीपासून सगळेच लांब राहणं पसंत करतात. पण, याच व्यक्तीचा आणखी एखादा गुणधर्म त्याच व्यक्तीच्या मनात असं काही घर करून जातो की बस... बाकी सगळं बाजूला पडतं आणि ती समोरची व्यक्ती आवडायला लागते. मग, तीच्या गुणांसहीत तिचे दोषही आपलेसे होऊन जातात. आपणं असेच काही स्त्रियांच्या स्वभावाचे पैलू पाहणार आहोत जे पुरुषांना आकर्षित करतात.
> लहान मुलांसारखी निरागसता समोरच्या व्यक्तीला आकर्षित करून घेते. कारण अशा महिला हसमुख, चंचल आणि तणावमुक्त असतात. त्यामुळे पुरुषांना अशा महिलेसोबत मानसिक दृष्टीकोनातून आराम मिळतो.
> पुरुषांना निडर आणि आत्मविश्वासी महिला खूप आकर्षित करतात. अशा महिलांसोबत पुरुष सहज आणि तणावमुक्त राहतात. कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगी अशा महिला पुरुषांमागे खंबीरपणे उभ्या राहतात त्यामुळे अडचण आली तर त्याचा टेन्शन पुरुषांना येत नाही. पुरुष बाहेरून कितीही स्ट्रांग असल्याचं भासवत असले तरी ते आतून मात्र फारच पोकळ आणि संकोची असतात. त्यामुळे त्यांनाही निडर जोडादार आपल्यासोबत असावं असं वाटतं.
> अनेक पुरुषांना शांत आणि रहस्यमयी महिला पसंत पडतात. कारण अशा महिलांबद्दल कोणताही अनुमान काढणं कठिण असतं. ही गोष्ट पुरुषांमध्ये जिज्ञासा उत्पन्न करते. ही उत्सुकताच पुरुषांना महिलांप्रती आकर्षित करते.

> बहुतेकदा पुरुष थोडे आळशी आणि बेजबाबदार असतात त्यामुळे त्यांना समजूतदार आणि जबाबदार महिला आकर्षक भासतात. अशा महिला आपलं योग्य पद्धतीनं काळजी घेऊ शकतात, असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते अशा महिलांकडे आकर्षित होतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.