मुंबई: शीर्षासनच्या नावानं बर्याच लोकांच्या भुवया उंचावतात. खरं तर शीर्षासन योग्य पद्धतीनं केलं तर अगदी सहजरीत्या करता येतं. शीर्षासन करताना योग्य पद्धत, योग शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाची गरज लागते.
जवळजवळ सर्व बॅलेन्सिंग आसन आत्मविश्वासावर अवलंबून असतात. शीर्षासन हे योगासनात अतिशय महत्त्वाचं आसन आहे म्हणून या आसनाला ‘किंग आसन’ किंवा फादर ऑफ आसन म्हणतात. कोणत्याही विद्यार्थ्याला एखादं आसन शिकवायचं म्हणजे त्या आसनाबद्दल पूर्ण माहिती असावी लागते म्हणजे आसन करण्याची पद्धत आणि किती वेळ आसनात थांबावं, ते कोणी करावं आणि टाळावं.
शीर्षासनाचे दोन प्रकार आहेत. बद्धहस्त शीर्षासन, मुक्तहस्त शीर्षासन.
शीर्षासनाचे फायदे म्हणजे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा जास्त होतो. त्यामुळं डिप्रेशन कमी होतं. तसंच बॉडी बॅलन्स आसन असल्यामुळं हात आणि मान मजबूत होते. व्हेरिकोस व्हेनसाठी तर हे आसन उत्तम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.