मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद

तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. 

Updated: Aug 7, 2015, 01:03 PM IST
मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर मसालेदार पदार्थांचा घ्या आस्वाद title=

लंडन : तुम्ही जर मसालेदार पदार्थांचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मसालेदार जेवण अनेक आजारांपासून दूर ठेवून मृत्यूला मागे टाकण्यात मदत करतं, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. 

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित पेपरमध्ये शोधकर्त्यांनी ही गोष्ट समोर मांडलीय. यामध्ये, म्हटल्यानुसार मसालेदार जेवण घेतल्यानं कॅन्सर, हृदय आणि श्वासामुळे होणाऱ्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होतो. महत्त्वाचं म्हणजे, ही गोष्ट पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागू होते. 

अध्ययनानुसार, यामध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांमध्ये ज्यांनी दररोज मसालेदार भोजन घेतलं त्यांच्या मृत्यूचा धोका इतरांच्या मानाने १४ टक्क्यांनी कमी होता. इतरांनी आठवड्यातून एक वेळा किंवा त्यापेक्षाही कमी वेळा मसालेदार जेवणाचा आस्वाद घेतला होता. 

ही गोष्ट मसालेदार जेवण घेणाऱ्या त्या लोकांवर लागू होते जे मद्य घेत नाहीत. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मसाल्यांमध्ये अशी तत्व आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात परंतु, यावर अजून शोध होण्याची आवश्यकता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.