नवी दिल्ली : ऋतू बदलाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा ग्लो टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. काही घरगुती उपायांनीही तुम्ही हिवाळ्याच्या मोसमात त्वचेचा ग्लो कायम राखू शकता
त्वचा स्वस्थ राहण्यासाठी तुमचे पोट साफ असणे आवश्यक असते. यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब मध टाकून प्या. यामुळे मुरुमे, पुटकुळ्यांच्या समस्या संपतील.
दोन लहान चमचे बेसनमध्ये अर्धा छोटा चमचा हळद मिक्स करा. या लेपात दहा थेंब गुलाबजल आणि दहा थेंब लिंबूरस मिसळा. हा लेप चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला वेगळीच चमक येते.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या. दिवसातून किमान दहा ग्लास पाणी प्या. पुरेशा प्रमाणात शरीरात पाणी गेल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होकते. त्वचा स्वस्थ आणि चमकदार होते. पाणी अधिक पिण्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.