नवी दिल्ली : हल्ली बैठी कामे कऱणाऱ्यांमध्ये शरीर फॅट होण्याचे प्रमाण वाढायला लागले. मांड्या, कमरेचा भाग या ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढायला लागले की शरीर बेढब दिसू लागते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागतो. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही मांड्याची चरबी कमी होत नाही. त्यासाठी आहेत या सोप्या टिप्स. ज्याचा वापर करुन तुम्ही मांड्याची अतिरिक्त चरबी कमी करुन त्या सडपातळ करु शकता.
१. दररोज ३० ते ४५ मिनिटे धावणे, सायकल चालवणे यांसारखा व्यायाम करा. यामुळे अतिरिक्त कॅलरीज बर्न होतील.
२. अधिक अंतर चालण्याचा व्यायाम केल्याने मांड्याची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
३. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चाला. चालण्याने प्रत्येक तासाला १०० ते ४०० कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे चालण्याचा व्यायाम उत्तम. लिफ्टपेक्षा जिन्याने चालत जा.
४. इतर कोणतीही एनर्जी ड्रिंक्स पिण्यापेक्षा भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायलाने तुमच्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते.
५. योग्य आणि पोषक आहार घ्या. खासकरुन फळे, लो फॅट दही अथवा चीज, भाज्या स्नॅक्स म्हणून खा.