चिंचेचे हे आहेत अनेक गुणकारी फायदे

आंबड-गोट चवीमुळे भारतीय पदार्थाच चिंचेला वेगळेच महत्त्व आहे. मात्र चिंच केवळ जेवणाती रुचीच वाढवत नाही तर अनेक गुणकारी लाभ यात आहेत. 

Updated: Feb 28, 2016, 07:52 PM IST
चिंचेचे हे आहेत अनेक गुणकारी फायदे title=

मुंबई : आंबड-गोट चवीमुळे भारतीय पदार्थाच चिंचेला वेगळेच महत्त्व आहे. मात्र चिंच केवळ जेवणाती रुचीच वाढवत नाही तर अनेक गुणकारी लाभ यात आहेत. 

चिंचेमध्ये व्हिटामिन बी, सी, कॅरोटिन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय स्कीन फ्रेंडली घटकही असतात जे त्वचेसाठी पोषक असतात. 

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी चिंचेचा वापर फायदेशीर ठरतो. ३० ग्रॅम चिंच १०० ग्रॅम पाण्यात टाकून उकळा. त्यानंतर या रसात अर्धा चमचा हळद टाका. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून तीनवेळा असे करा. चेहऱ्याच्या रंगामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 

केस गळती कमी करण्यासाठीही चिंचेचा वापर करतात. चिंच पाण्यात भिजत घाला. त्यानंतर चिंचेचा कोळ केस आणि स्काल्पवर लावा. अर्धा तास केसांना हा रस लावून ठेवा. त्यानंतर शाम्पूच्या मदतीने केस धुवा. आठवड्यातून दोनवेळा असे केल्यास याचे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसतील. 

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ बनवून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा. १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर दुधाच्या मदतीने ही पेस्ट काढा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.