200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत

जवळपास 200 वर्ष जुन्या कंडोमचा स्पेनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. 

Updated: Feb 28, 2016, 01:41 PM IST
200 वर्ष जुन्या कंडोमचा लिलाव, मिळाली विक्रमी किंमत title=

मुंबई : जवळपास 200 वर्ष जुन्या कंडोमचा स्पेनमध्ये लिलाव करण्यात आला आहे.  या कंडोमला 46 हजार रुपयांना विकत घेण्यात आलं आहे. हा कंडोम मेंढीच्या आतड्यापासून बनवण्यात आला होता.

स्पेनमधल्या एका शहरामध्ये हा कंडोम एका बॉक्समध्ये सापडला होता. कॅटाविकीमध्ये या ऐतिहासिक कंडोमचा लिलाव झाला. हा कंडोम विकत घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. त्यामुळे आपल्या मूळ किंमतीच्या दुप्पट किंमतीला हा कंडोम विकला गेला.

अॅमस्टरडॅमच्या एका व्यक्तीनं हा कंडोम खरेदी केला आहे. 19 सेंटिमीटर लांब असलेला हा कंडोम जगातला सगळ्यात महाग कंडोम आहे.