मनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे

मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे

Updated: Jan 29, 2017, 10:38 AM IST
मनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे title=

मुंबई : मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे

१. मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. 

२. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

३. मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.

४. यात पोटॅशियमची मात्रा अधिक असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो.

५. मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

६. यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.

७. मध आणि मनुक्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो.

८. यात फॉलिक अॅसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.

९. मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.