मुंबई : निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप गरजेची असते. माणसाला कमीत कमी आठ तासांची झोप लागते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. त्यामुळे दररोज पुरेशी झोप कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. मात्र त्याचबरोबर झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यास त्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
संशोधनानुसार, डाव्या कुशीवर झोपल्याने खालील फायदे होतात.
1. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीन होतो.
2. ज्यांना छातीत जळजळची समस्या जाणवत असले अशा व्यक्तींनी डाव्या कुशीवर झोपल्यास हा त्रास कमी होतो.
3. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर ठरते.
4. पोटासंबंधीचे विकार असल्यास डाव्या कुशीवर नियमित झोपावे.
5. गर्भवती असताना महिलांच्या पायाला सूज येते. यावेळी अशा महिलांनी डाव्या कुशीवर झोपावे.
6. रक्तप्रवाह सुरळीत होतो.