मुंबई : दीर्घायुषी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आहे. यासाठी स्वस्थ दिनचर्या आणि पौष्टीक आहार खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला वाटते ही त्याला वृध्दत्व लवकर येऊ नये. त्याचे तारूण्य कायम राहावे.
चांगल्या आहार घेतल्यास ऑस्टियोपोरोसिस, जुने ऑस्टियोआर्थराइटिस, गुडघ्यांचे दुखणे, कमजोर हाडं या आजारापासून दूर राहता येते.
१) केस आणि जॉइंट्स : अनेक प्रकारचे फळ, भाज्या आणि धान्यात मेदीसुलफोनीलमीथेन (MSM)एक रसायन आढळते. हे सल्फरचे ऑर्गेनिक कंपाउंड असते. हे तुमच्या शरिरातील जॉइंट्सला सक्रिय ठेवतो. तसेच ह रसायन तुमच्या केसांसाठी फायदेशीर असते.
२) सोया फू़ड : सो़डा फूडच्या सेवनाने ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांननी सोयाबीनला गोल्डनबीनची उपाधी दिली होती. यातील पौष्टिक तत्व परिपूर्ण आहे, जे डाळींमध्ये सर्वाधिक आहेत. सोयाबीनच्या सेवनाने तुमच्या हृदयाचे आजार कमी होतात. सोयाबीन तुमच्या शरिरासाठी खूप गुणकारी असते.
३) वनस्पतींचे तण : दुधी भोपळा किंवा भोपळ्यांच्या बियांमध्ये टी सेल्स (किलर सेल्स) असतात. त्या शरिराला स्वस्थ बनविण्याची महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुले जास्त जास्त वनस्पतींचे स्टेरॉल्स घेणे उपयोगी आहे. सुंदरता वाढविणे आणि वृद्धत्वाला बऱाच काळ दूर ठेवण्यात मदत होते. हा एक रामबाण उपाय आहे.
४) ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑईलचा प्रयोग शरिरासाठी खूप फायदा देणारा आहे. हा केसातून कोंडा समाप्त करतो. ऑलिव्ह ऑईलचा उपयोग खाण्यात आणि सलाड बनविण्यासाठी केला जातो. ऑलिव्ह ऑईल तुमचे सौंदर्य बराच काळ टिकविण्यात मदत करतो. तसेच शरिराला स्वस्थ राखण्यात मदत करतो.
५) द्राक्ष : फळांमध्ये सर्वोत्तम द्राक्षाला मानले जाते. द्राक्ष दुर्बल-सबल, स्वस्थ-अस्वस्थ या सर्वांसाठी समान उपयोगी होतो. यात अँटी ऑक्साइड असते. हे मेंदूला बऱ्याच कालावधी सौंदर्य कायम राखण्यात आणि आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करते. द्राक्ष खाल्याने अल्झायमर सारखे आजार होत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.