मुंबई : विशेष चव तसंच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेंडी या फळभाजीत अनेक पोषक तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासरखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते.
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतें
ज्या व्यक्तींना आपलं वजन कमी करायचं आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळं आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामिन सी हे जीवनस्तव असतं. हे आपली इम्यूनिटी सिस्टमची शक्ती वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. भेंडीतील व्हिटामिन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी बनवते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.