नवी दिल्ली : पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवगळे व्यायाम प्रकार करतात. मात्र, चरबी काही कमी होत नाही. पोट सुटलेले दिसते. तुम्ही योग्य प्रकारे वर्कआऊट केले तर एका आठवड्यात तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. शिवाय तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.
# तुम्ही तुमचे बॉडीवेट कमी करण्यासाठी पुशब, सूर्य नमस्कार, योगा, स्टेबिलिटी बॉल यावर आठवडाभर भर द्या.
# किमान ३० ते ४५ मिनिटे वर्कआऊट करा. तुम्हाला आठवड्यात फरक दिसून येईल.
# जेवण झाल्यावर किमान दररोज थोडे तरी चालले पाहिजे.
# आपले शरीर ताजेतवाण ठेवण्यासाठी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे.
# कुकीज, केज, चिप्स तसेच जंक फूड आणि उच्च कॅलरीज देणारे पदार्थ खाण्याचे टाळा. आपल्या खाण्यातील साखरेचे प्रमाण कमी करा. त्यामुळे तुमची अधिकची चरबी वाढणार नाही.
# ताज्या भाज्या, फळे, पूर्ण आहार घ्या आणि उच्च फायबर असलेले पदार्थ आपल्या जेवणात घ्या. बघा तुमची चरबी वाढणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.