पीरियड्सचे दुखणं कमी करण्यासाठी 'आलं' खूप उपयोगी

मासिक धर्म दरम्यान, माहिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात कमरेच्या खालील भागात खूप दुखू लागण्याची समस्या बहुतांशी महिलांना असते. त्यापासून सुटकारा मिळविण्यासाठी महिला अनेक औषध वापरतात. तर काही घरगुती उपाय वापरतात. पण याचे काही साइट इफेक्ट असतात. त्यामुळे अधिक समस्या होऊ निर्माण होऊ शकतात. 

Updated: Dec 14, 2015, 09:31 PM IST
पीरियड्सचे दुखणं कमी करण्यासाठी 'आलं' खूप उपयोगी  title=

 मुंबई : मासिक धर्म दरम्यान, माहिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात कमरेच्या खालील भागात खूप दुखू लागण्याची समस्या बहुतांशी महिलांना असते. त्यापासून सुटकारा मिळविण्यासाठी महिला अनेक औषध वापरतात. तर काही घरगुती उपाय वापरतात. पण याचे काही साइट इफेक्ट असतात. त्यामुळे अधिक समस्या होऊ निर्माण होऊ शकतात. 
 
 औषधांचा परिणाम 
 
 पीरियड्स दरम्यान औषधांचा वापर विपरीत परिणाम देऊ शकतात. बहुतांशी वेळा औषधे महिलाच्या आरोग्यावर आणि प्रजनन अंगावर वाईट परिणाम टाकू शकतात. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपाय वापराल तर त्या संदर्भात सर्व माहिती असणे गरजेचे आहे आलं म्हणजे अदरकचा उपयोग पीरियड्सचा दुखणे कमी करण्यासाठी चांगला उपाय असतो. 
 
 आल्याचा वापर
 आल्याचा वापर करून पीरिअडसचे दुखणे कमी करण्यासाठी २९ ग्रॅम आलं घ्या. ते एक ग्लास पाण्यात उकळवा. पाणी उकळून निम्मे झाले तर त्याल गाळून दिवसातून दोन वेळा प्यायले पाहिजे. पीरियड्स सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदर पासून याची सुरूवात करू शकतात. असे लागोपाठ दोन महिने केल्यास तुमची समस्या दूर होईल. तसेच पीरियड्स सुरू असताना चहामध्ये आल्याचा वापर करा. चहामध्ये आल्याचा वापर केल्यास पीरिअडसचे दुखण्यापासून आराम मिळण्यात उपयोग होतो. 
 
 आलं आणि सूंठ सूप 

 
मासिक धर्मावेळी दुखण्याची समस्या दूर करण्यासाठी आलं, सुंठाचा सूप खूप उपयोगी होतो. आल्याचे तुकडे, सुंठ आणि गूळ पाण्यात गरम करून त्याचा सूप तयार करा. हलका थंड झाल्यावर तो प्यावा. दुखणं दूर होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.