बीजिंग : सर्वसामान्य वस्तूंच्या वापरामुळे महिलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. हात धुण्याचा साबण, शॅम्पू तसेच पॅकिंग खाद्यपदार्थांमुळे महिलांना गर्भपाताचा धोका पोहोचत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. आरोग्याच्याबाबतीत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे.
दररोज हात धुण्याचा साबण, शॅम्पू आणि खाद्य पदार्थांचे पॅकिंग आदींचा वापर करणाऱ्या महिलांसाठी हा धोका अधिक असतो. हा धोका प्रेग्नंट अवस्थेत ५ ते १३ आठवड्यादरम्यान अधिक होतो. चीनमधील बीजिंगमधील पिकिंग विद्यापीठातील अभ्यासकांनी ३०० महिलांचा अभ्यास केला. त्यातून ही बाब पुढे आली.
अधिक वाचा : चणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!
अभ्यासकांनी म्हटलेय, या पदार्थांशी ज्यांचा संपर्क येतो किंवा कारखान्यात काम करणाऱ्यांना याचा धोका अधिक पोहोचतो. त्यामुळे भविष्यात लोकसंख्येवर याचा परिणाम होऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली गेलेय.
यातील काही पदार्थांच्या वापरामुळे भविष्यात मोठा धोका पोहोचू शकतो, असे अभ्यासकांनी म्हटलेय. तसेच या वस्तूंच्या कारखान्यात प्रेग्नंट असणाऱ्या महिला काम करीत असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात गर्भापाताचा धोका असतो, हे संशोधनातून पुढे आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.