सफरचंद खाणं दातासाठी नुकसानकारक!

दररोज एक सफरचंद खाल्ल्यानं भलेही आपण आजारांपासून दूर राहू. पण दातांच्या डॉक्टरांचा धंदा नक्कीच वाढू शकतो. म्हणजे सफरचंद आपल्या दातांना नुकसानकारक ठरू शकतं. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आलीय. हा निष्कर्ष ४५८ डेन्सिट्सच्या सर्वेक्षणात पुढे आलाय.

Updated: Jan 18, 2015, 10:32 AM IST
सफरचंद खाणं दातासाठी नुकसानकारक! title=

लंडन: दररोज एक सफरचंद खाल्ल्यानं भलेही आपण आजारांपासून दूर राहू. पण दातांच्या डॉक्टरांचा धंदा नक्कीच वाढू शकतो. म्हणजे सफरचंद आपल्या दातांना नुकसानकारक ठरू शकतं.नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आलीय. हा निष्कर्ष ४५८ डेन्सिट्सच्या सर्वेक्षणात पुढे आलाय.

वेबसाइट फीमेल फर्स्ट डॉट को डॉट यूकेच्या एका रिपोर्टनुसार पाच पैकी चार तज्ज्ञांनी सांगितलं की, फळ खाल्ल्यानं दात खराब होतात. दातावर प्लेक तयार होतं आणि दंतवल्क (एनामोल) क्षय होतं.  तर तिसऱ्यानं सांगितलं की, चॉकलेट आणि बिस्किटसोबत सफरचंद खाल्ल्यानं दात आणि हिरड्यांना नुकसान होतं. 

किंग्ज डेंटल इंस्टिट्यूटचे शोधकर्ते डेविड बर्टलेटच्या निष्कर्षानुसार फळ खाल्ल्यानं दातांचं तितकंच नुकसान होतं. जितकं कार्बोनेटयुक्त पेय पिल्यानं होतं. फळांचा ज्युस प्यायल्यानं हिरड्यांना नुकसान होतं, असंही   अर्ध्या तज्ज्ञांनी सर्वेक्षणादरम्यान इशारा देत सांगितलं 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.