व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....

व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता. 

Updated: Jan 17, 2015, 08:11 AM IST
व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी.... title=

मुंबई : व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता. 

स्थूलपणा आजारपणांचं घर असतं, हे लक्षात असू द्या. शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी म्हणजे स्थूलपणा... यामुळे, वजनही प्रमाणाबाहेर वाढतं. ज्या व्यक्तीचा 'बीएमआय' म्हणजेच बॉडी मास इंडेक्स २५ ते २९.९ पर्यंत असतो, त्याला डॉक्टरी भाषेत 'ओव्हरवेट' म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त वजन म्हटलं जातं. तर, दुसरीकडे बीएमआय ३० किंवा त्यापेक्षा अधिक असतो तेव्हा त्याला स्थूलपणा म्हटलं जातं. स्थूलपणा कमी करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष देणंही गरजेचं असतं. तसंच, योगा आणि कसरतीनं शरीराला दिलेला थोडा फार ताणही स्थुलपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. 

काही छोटे छोटे पण परिणामकारक उपाय.... 
- जेवण झाल्यानंतर कोमट पाणी पिल्यानं वजन लवकर कमी होतं. परंतु, जेवण झाल्यानंतर जवळपास पाऊण किंवा एका तासानं एक ग्लास पाणी प्यायला हवं.

- कच्ची किंवा पिकलेली पपईही यावरचा उत्तम उपाय आहे. यामुळे, शरीरात अतिरिक्त चरबी न जमता वजन कमी होण्यास मदत होते.

- दह्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. ताकाचं सेवनही दिवसातून दोन-तीन वेळा करणं लाभदायक ठरतं. 

- गरम पाण्यात लिंबूचा रस आणि मध मिक्स करून रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यानं पोटही साफ राहील आणि स्थूलपणाही कमी होईल.

- ग्रीन टीमध्ये अँन्टी ऑक्सीडेंट असतं, यामुळे स्थुलपणासोबतच चेहऱ्यांवरच्या सुरकुत्याही कमी होतात. ग्रीन टी साखरेशिवाय पिल्यानं त्याचा जास्त फायदा होतो. 

- 'अॅप्पल साईडर वेनिगर' पाणी किंवा ज्युससोबत घेतल्यानं स्थुलपणा लवकर कमी होतो. पचनप्रक्रिया यामुळे योग्य राहते आणि शरीरातील कोलेस्ट्रलही कमी होतं. 

- रोज सकाळी सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्या. यामुळे शरीरातील फॅटस् कमी होतात.

- रोज फुलकोबीचा ज्युस पिल्यानं चरबी कमी होते. यामुळे, शरीरातील मेटबॉलिजम योग्य प्रमाणात राहतं. 

- सकाळी उठल्यानंतर २५० ग्रॅम टोमॅटोचा रस २-३ महिने पिल्यानं फॅटस कमी होतात. 

- एक चमचा पुदिन्याच्या रसात २ चमचे मध टाकून पिल्यानं स्थुलपणा कमी होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.