उत्तम स्वस्थ्यासाठी करा अर्धा तास व्यायाम...

वजन वाढलंय असं लक्षात आल्यानंतर जीम जॉईन केलं की तिथं एकाच दिवशी तास न् तास घालवणारे काही जण तुमच्याही नजरेस पडत असतील ना!... पण,

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 26, 2013, 10:27 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, कोपेनहेगन
वजन वाढलंय असं लक्षात आल्यानंतर जीम जॉईन केलं की तिथं एकाच दिवशी तास न् तास घालवणारे काही जण तुमच्याही नजरेस पडत असतील ना!... पण, नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार प्रत्येक दिवशी ३० मिनिटं शारीरिक व्यायाम केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, असं लक्षात आलंय. सोबतच लोकांना स्वस्थ जीवन जगण्यासाठीही व्यायामामुळे प्रेरणा मिळते.
कडक प्रशिक्षणापेक्षा हलका-फुलका व्यायामही लोकांसाठी प्रेरणादायी ठरतो, असं कोपेनहेगन विश्वविद्यालयानं केलेल्या एका संशोधनात आढळून आलंय. याच निष्कर्षाला जनस्वास्थ्य पत्रिका ‘स्कॅनडिनावियन’मध्ये प्रकाशित करण्यात आलंय.
सायन्स डेलीनं प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, जाडसरपणा हा सामाजिक-आर्थिक स्थितीचा परिणाम आहे. कोपेनहेगन विश्वविद्यालयाच्या संशोधनकर्ते या समस्येपासून सावध राहण्याचा आणि त्यावर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

जाडसरपणा ही एक जील समस्या आहे, याविषयाकडे बहू-विषयक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे, असं कोपेनहेगन विश्वविद्यालयाचे बायोमेडिकल विभागाचे प्रोफेसर बेंटे स्टालनेच यांनी म्हटलंय. नियमितपणे प्रत्येक दिवशी केवळ ३० मिनिटं जरी हलका-फुलका व्यायाम केला तरी तो कडक व्यायामाप्रमाणेच शरीरासाठी उपयोगी ठरतो, असंही त्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.