नवी दिल्ली : हळद हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्याच किचनमध्ये आढळते. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाहीये तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो. केवळ हळकुंडच नव्हे तर हळदीच्या पानांचादेखील वापर होतो.
१. हे आहेत हळदीचे लाभदायक फायदे
२. चेहऱ्यावरील डाग, व्रण घालवण्यासाठी हळदीचा वापर होतो. हळद आणि तीळाची एकत्रित मिश्रण करुन चेहऱ्यास लावल्याने चेहऱ्यावरील मुरमांचे काळे डाग नष्ट होतील.
३. हळद आणि दूध मिक्स करुन त्याचा लेप चेहऱ्यास लावल्यास रंग उजळतो.
४. सर्दी-खोकल्यात दुधात हळद टाकून प्यायल्यास फायदा होतो.
५. त्वचेवर नको असेलले केस उगवल्यास हळद आणि नारळ पाणी एकत्र करुन पेस्ट बनवा. ही पेस्ट हात आणि पायांवर लावा. यामुळे नको असलेल्या केसांपासून सुटका होईल.
६. तोंड आल्यास कोमट पाण्यात हळद पावडर मिक्स करुन त्याच्या गुळण्या करा.
७. जखमेवर हळद गुणकारी ठरते.
८. उन्हात गेल्यास त्वचा काळवंडते. यासाठी हळद, बदाम पावडर आणि दही एकत्रित करुन काळवंडलेल्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचेचा रंग उजळेल. हे एका सनस्क्रीन लोशनप्रमाणे काम करते.