www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी झी न्यूजला देण्यात आलेल्या अपुऱ्या मुलाखतीमुळे ते आणि त्यांचा पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपला अडचणीत टाकण्यासाठी मुद्दा शोधणाऱ्या काँग्रेसला ही अपुरी मुलाखत आयतं कोल्हीत मिळालं आहे. या मुलाखतीत जोशींनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न विचारू नये यासाठी झी मीडियाच्या रिपोर्टरला धमकावले, त्यांचा हा कारनामा मात्र दुसऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोमवारी झी मीडियाला जोशी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत जोशी यांनी रिपोर्टरला सांगितले की त्यांना राष्ट्रीय मुद्द्यावरील प्रश्न विचारा मोदींबाबत विचार करू नये. भाजपच्या या वरिष्ठ नेत्याने रिपोर्टर आणि कॅमेरामॅनला मुलाखतीचे संपूर्ण फुटेज दाखविण्यास सांगितले. तसेच या मुलाखतीतील विवादास्पद मुद्द्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी फुटेज डिलीट करण्यास सांगितले.
झी मीडियाच्या रिपोर्टरने हे फुटेज डिलीट करण्याबाबत विरोध केला आणि सांगितले की ही मुलाखत तुम्ही फिक्स करू नका. त्यावर जोशींनी त्यांना धमकावले की तुम्ही या घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यानंतर जोशी यांनी संपूर्ण मुलाखत पाहिली आणि काही फुटेज डिलीटही केले.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जोशींनी सांगितले होते, की मोदीची लहर नाही भाजपची लहर आहे. एका मल्याळम वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोशींनी सांगितले होते की, ही लहर असले किंवा ती लहर मोदी एक पीएम उमेदवार म्हणून पक्षाचे प्रतिनिधी आहे. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची लहर नाही, ही भाजपच्या प्रतिनिधीत्वाची लहर आहे. मोदींना देशातील वेगळ्या भागातील, समाजातील विविध वर्गातील आणि भाजपच्या विविध नेत्यांचे समर्थन मिळत आहे.
मोदींनी वाराणसीतून उमेदवारी दिल्याबद्दल तसेच जसवंत सिंह यांना भाजपमधून काढल्याबद्दल विरोध केला होता.
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ता अखिलेश सिंह सांगितले की, माझा पक्षाकडून अशाप्रकारे कृत्य करत नाही. मीडियाच्या स्वातंत्र्याला आळा कधीच घातला नाही पाहिजे.
तर भाजप नेता शत्रुघ्न सिन्हा सांगितले की, हे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याविरोधात आहे. असे करणे चुकीचे आहे असे नाही करायला हवे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.