www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच्या निवडणूक अर्जावर सूचक होण्यास म्हणून सही करण्यास प्रख्यात सनईवादक `भारतरत्न` बिस्मिल्ला खान यांच्या कुटुंबियांनी नकार दिलाय. वाराणसीमधून मोदी 24 एप्रिलला अर्ज भरणार आहेत.
नियमानुसार एका स्थानिक व्यक्तीची सूचक स्वाक्षरी लागते. त्यासाठी वाराणसीचे महापौर रामगोपाल मोहाले यांनी आपल्याला संपर्क केला. मात्र आपण नकार दिल्याचा दावा बिस्मिल्ला खान यांच्या नातवानं केलाय. आम्हाला राजकारणापासून दूर रहायचं आहे, असं अफिक हैदर म्हणाले.
प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित चन्नूलाल मिश्र यांनी मात्र महापौरांची विनंती मान्य केलीये. तसंच अलाहाबाद न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गिरिधर मालवीय यांनीही सूचक होण्यास तयारी दर्शवली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.