प्रियंका गांधींना नेमका कुणाचा विरोध?

भाजपचे पंतप्रधान पदाचे उममेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी-वडेरा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्ष नेतृत्वानं याला मात्र विरोध दर्शवला होता.

Updated: Apr 15, 2014, 08:28 AM IST

WWW.24TAAS.COM, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधान पदाचे उममेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी-वडेरा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र, पक्ष नेतृत्वानं याला मात्र विरोध दर्शवला होता.
प्रियंका गांधी मोदींच्या विरोधात लढल्या असत्या तर नरेंद्रा मोदींना जास्त महत्त्व दिल्यासारखं झालं असतं अशी चर्चा होती.. मात्र, या वृत्तानंतर मात्र प्रियांका गांधी  वृत्तवाहिन्यांकडे हे वृत्त फेटाळून लावलंय.
राहुल गांधीनी आपल्याला निवडणूक लढवण्यास संगितल होतं. मात्र, आपणच नकार दिला. आणि आपण अमेठी आणि रायबरेली याच मतदारसंघात काम करणार असल्याच प्रियांका गांधी यानी पुन्हा स्पष्ट केलं.
त्याचप्रमाणे आपण निवडणूक लढवली असती तर आई, भाऊ आणि नवरा सगळ्यांनी साथ दिली असती असंही त्या म्हणाल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.