वाराणसीत नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नावच नसेल!

भाजपच्या पंतप्रधानांच्या उमेदवारानं - नरेंद्र मोदींनी गुरुवारीच वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण, नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नाव नसेल, असं आता स्पष्ट करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 25, 2014, 07:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपच्या पंतप्रधानांच्या उमेदवारानं - नरेंद्र मोदींनी गुरुवारीच वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण, नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नाव नसेल, असं आता स्पष्ट करण्यात आलंय.
होय, हे खरं आहे. नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नसण्यामागचं कारण म्हणजे वाराणसी मतदारसंघातत मतदान करण्यासाठी `ईव्हीएम` मशीनच नसेल... तर या ठिकाणी मतदानासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी मतदारसंघामध्ये यंदा चक्क ७७ उमेदवार उभे राहिले आहेत. त्यामुळं या ठिकाणी `ईव्हीएम`ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची पाळी निवडणूक आयोगावर येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार उभे राहण्याचा विक्रमही बहुधा वाराणसी मतदारसंघातच होईल, अशी चिन्हे आहेत. मोदींसह एकूण ७८ उमेदवार वाराणसीमध्ये सध्या उभे असल्यानं `ईव्हीएम`ची काशी होईल.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ६६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास `ईव्हीएम`वर मतदान घेता येत नाही. २८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. छाननीनंतर ६६ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरल्यास निवडणूक आयोगाला याठिकाणी मतपत्रिका छापाव्या लागतील आणि पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे मतपेट्या ठेवाव्या लागतील, असं चित्र सध्या तरी दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.