www.24taas.com, मुंबई
महापालिका निवडणुकीला अवघे काही तास बाकी असल्याने आता मतदानासाठी आवश्यक अशी तयारी केली जात आहे. गुरुवार १६ फेब्रुवारीला १० महापालिकांसाठी मतदान होतं आहे. त्यासाठी मतदान यादीत आपलं नाव शोधण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गाईडलाईन्स खास आपल्यासाठी. मतदारांना गाईडलाईनचा फायदा मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी नक्कीच होईल. जाणून घ्या मतदानासाठीची गाईडलाईन्स.
मतदारांसाठी गाईडलाईन्स
मतदार यादीत आपलं नावं शोधण्यासाठी आपण पुढील काही साधनांचा वापर करून आपलं नाव कुठल्या यादीत आहे ते जाणून घेऊ शकतात. वेबसाईट, एसएमएस आणि फोन याद्वारे आपण आपली यादी पाहू शकता.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी पाहा वेबसाईट -
मतदारांनी आपले नाव मतदारयादीत शोधण्यासाठी आता वेबसाईटचा आधार घेता येणार आहे. त्यासाठी लॉग ऑन करा, www.mcgmelection.org या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर कॉलममध्ये मतदारांनी आपलं नाव टाइप केल्यास दिसून येईल.
.
.
.
.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी करा एसएमएस -
मतदारयादीत आपलं नाव शोधण्यासाठी आता तुमच्या मोबाईलद्वारे देखील जाणून घेता येईल. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये मेसेजेमध्ये जाऊन टाईप करा, नाव आणि वय आणि पाठवून द्या 56677 या नंबरवर.
मतदारयादीत नाव जाणून घेण्यासाठी कसा कराल एसएमएस?
voter<space>mcgm<space> fullname<space>age मेसेज करावा.
.
.
.
हॅलो मतदार यादीत आमचं नाव आहे का?
त्याप्रमाणेच मतदार ९२२५३२००११ या क्रमांकावर देखील संपर्क साधून मतदारयादीतील नाव माहीत करून घेऊ शकतात. स.८ ते रा.८ पर्यंत वरील नंबरवर फोन करू शकता.
.
.
.
.
.
मतदानासाठी काय काय ओळखपत्र बाळगावीत?
मतदानासाठी मतदारांनी पुढीलप्रमाणे ओळखपत्र आपल्याजवळ बाळगावीत. पासपोर्ट, सरकारी आणि, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे नोकरीचे ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक किंवा, पोस्टाचे पासबूक, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी मतदानासाठी आवश्यक असे काहीही ओळखपत्र म्हणून आपण सोबत घेऊन जाऊ शकता.
[jwplayer mediaid="48300"]