नरेंद्र मोदींवर अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Apr 30, 2014, 08:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.
मतदान केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केलं, याला निवडणूक आयोगाने आचार संहिता भंग झाल्याचं सांगून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, यानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निवडणूक आयोगाने म्हटलंय की, नरेंद्र मोदी यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 126 ए आणि 126 बीचं उल्लंघन केल्याचा मोदींवर आरोप आहे.
मतदान केल्यानंतर मोदी म्हणाले होते, माझ्या समोर लोकांची गर्दी जमली आहे, ते मला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत, यावरून हे स्पष्ट आहे की, आई आणि मुलाचं सरकार गेलंय.
यावेळी मोदी शाई लावलेलं बोट दाखवतांना हातात कमळ घेऊन होते, आणि जाणीपूर्वक कमळ दाखवत होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.