www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मंत्रिपदासाठी लावण्यात आलेल्या लांब रांगेबाबत नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांना खडसावले आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंग करून नये, अशा शब्दांत ताकीद दिली आहे.
रविवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुप्पा आणि भाजपचे सरचिटणीस अनंत कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली कर्नाटकमधून निवडून आलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळानने नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मंत्रिपद मिळविण्यासाठी लॉबिंग करण्यापेक्षा आपल्या राज्यात पक्षाला मजबूत करण्यासाठी आपल्याला काम करायचे, असल्याचे मोदींनी सांगितले.
शिवसेना आणि टीडीपीसारख्या सहयोगी दलाचे टॉप नेते नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आहेत. या दोन्ही राज्यात भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण त्यांना याचे भानही आहे की भाजपने एकट्याच्या जीवावर बहूमत मिळविले आहे.
रविवारी एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान आणि चिराग पासवान यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राम विलास पासवान यांनी सांगितले की, मला काही अपेक्षा नाही. मोदींजीवर अवलंबून आहे की ते काय करतात. कॅबिनेटमध्ये सहभागी होणे माझे लक्ष्य नाही. माझी प्राथमिकता तरुणांसह विकासाचा मुद्दा आहे. एलजेपीने बिहारमध्ये भाजपसह युती करून ७ पैकी ६ जागा मिळविल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.