संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये `का रडले मोदी`?

नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, लालकृष्ण आडवाणीजींनी एक शब्द प्रयोग केला, मी आडवाणीजींना विनंती करू इच्छीतो, कृपया त्या शब्दाचा वापर........ करू नका.

Updated: May 20, 2014, 05:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संसदेच्या सेंट्र्ल हॉलमध्ये आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होती, या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली, यावेळी नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं, एक क्षण असा आला की मोदी भावूक झाले, आणि सेंट्रल हॉल स्तब्ध झाला.
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, लालकृष्ण आडवाणीजींनी एक शब्द प्रयोग केला, मी आडवाणीजींना विनंती करू इच्छीतो, कृपया त्या शब्दाचा वापर........ करू नका.
लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, नरेंद्र भाईंनी कृपा केली.
(नरेंद्र मोदी हे बोलतांना एवढे भावूक झाले की, त्यांनी पोडियम डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, दरम्यान सुरक्षा रक्षकास पाणी आणण्यास खुणावलं, थोडसं पाणी पिल्यावर मोदी पुन्हा स्वत:ला सावरत पुढे म्हणाले.)
"काय आईची सेवा ही कधी कृपा होऊ शकते?", "कधीच होऊ शकत नाही".
"कारण `भारत माझी माता` आहे, तशीच `भाजपाही माझी माता` आहे", असं नरेंद्र मोदी यांनी सांगताचं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमलेल्या भाजपाच्या खासदारांनी जोरदार बाकं वाजवली.
पाहा का रडले मोदी?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.