www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसनं पालघर मधून राजेंद्र गावितांना आपली उमदवारी दिलीये.मत्र या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर हितेंद्र ठाकूर यांच्यावर अवलंबून राहावं लागेल असंच काहिसं चित्र आहे.
पालघर मतदार संघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आणि खासदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर वर्चस्व असलेल्या या मतदार संघात काँग्रेसनं मंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिलीये. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २००९ साली राजेंद्र गावित यांच्या रुपाने केवळ एकमेव आमदार निवडून आला होता. तेच यावेळी लोकसभेच्या रिंगणात आहेत. या भागात हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व लक्षात घेता इथून ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव काँग्रेसनं ठेवला होता. पण ठाकूर यांनी हा प्रस्ताव फेटाळला.
पालघरमधली सध्याची राजकीय स्थिती संमित्र आहे. गेल्या पाच वर्षात झालेल्या ग्रामपंचायती निवडणुका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकात प्रत्येक पक्षाला संमिश्र असं बहुमत आहे. यात वसई-विरार सारख्या शहरी पंचायतींवर हितेंद्र ठाकूर यांचा प्रभाव आहे.
पालघर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे २, काँग्रेसचा १, अपक्ष १ कम्युनिस्ट पक्षाचा १ भाजपचा १ असे बलाबल आहे. तर सध्या पालघरमध्ये ठाकूर यांचा खासदार आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघात वर्चस्व असलेले ठाकूर आता काय भूमिका घेणार यावर पारघरमधील काँग्रेस उमेदवाराचे भविष्य अवलंबून असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ