अहमदाबादेत केजरीवाल यांच्या कारची काच फोडली

अहमदाबादेत अरविंद केजरीवाल यांच्या कारच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Mar 5, 2014, 08:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
अहमदाबादेत अरविंद केजरीवाल यांच्या कारच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
केजरीवाल यांच्या गाडीची काच तडकली असल्याचीही माहिती आली आहे.
अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये आहेत, गुजरातच्या विकासामागे खरं काय आहे, हे पाहण्यासाठी ते गुजरातमध्ये आहेत.
दरम्यान आज दुपारी आचारसंहिता लागू झाल्याने, अरविंद केजरीवाल यांचा रोड शो पोलिसांनी थांबवला होता. तसेच अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतल्याचंही सांगण्यात आलं होतं.
मात्र अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलं नसल्याचं पाटनच्या पोलिस अधिक्षकांनी स्पष्ट केलं आहे.
अरविंद केजरीवाल यांचा रो़ड शो गुजरातमध्ये थांबवल्याची बातमी आल्यानंतर, दिल्लीत आप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर प्रदर्शनं केलं.
समोरा-समोर येऊन भाजप आणि आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र तासाभरात आप आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली, याच दरम्यान उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही आप आणि भाजपचे कार्य़कर्ते आमने-सामने आले.
सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांच्या गाडीच्या ताफ्यावर प्रदर्शन कऱणाऱ्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या गाडीची काच तडकली असल्याचंही सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.