ऑडिट मतदारसंघाचं : सांगली

ऑडिट मतदारसंघाचं : सांगली

Updated: Apr 4, 2014, 05:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगली लोकसभा मतदारसंघात नाट्यपंढरी आणि सहकारपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवणा-या वसंतदादा पाटीलांनी, या लोकसभा मतदारसंघाचं आमदारपद भूषवलं आहे.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय आणि प्रबोधनाचा वारसा लाभलेला मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. विष्णुदास  भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले ते याच सांगलीमध्ये. या भूमीचे सुपुत्र असणा-या बालगंधर्व यांनी संगीत रंगभूमीवर अजरामर कामगिरी केली. 
प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पठ्ठे बापुराव यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. साहित्यिक ग. दि. माडगुळकरांपासून म.द. हातकणगंलेकरसारख्या अनेक साहित्यिकांची मांदियाळी इथलीच. रोजगार हमी योजनेचे शिल्पकार वि.स.पागे हे ही सांगलीचेच. 
उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती होते ती सांगलीतल्या मिरजे मध्येच. कृष्णेच्या  पाण्यावर  तयार  झालेला  भाजीपाला, गुणकारी  हळद   आणि  हळदीची  पेवे  सुद्धा  इथलीच.  उस, गुळ आणि साखरेची  गोडी  सांगलीच्याच साखरेला असं म्हटलं जातं. 
साता-समुद्रापार निर्यात होणारे रसरशीत द्राक्षे आणि डाळींब देखील सांगली जिल्ह्यातीलच. सहकारी साखर कारखानदारी आणि दुधसंस्था यामुळे सांगलीच राजकारण मुरलेल, आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणात सांगली ही महत्त्वाच्या स्थानी कायम आहे.
सांगली मतदारसंघ हा कॉँग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला गेला आहे. 1980 - 84 मध्ये कॉँग्रेसच्या शालनी व्ही. पाटील या खासदार होत्या तर कॉँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढवत 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये असं सलग चार वेळा प्रकाशबापु वसंतराव पाटील हे खासदार होते. त्यानंतर मात्र 1996 आणि 1998 मध्ये खांदेपालट झाली आणि मदन पाटील हे काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा लोकसभेत गेले.
मग मात्र प्रकाशबापूंनी दिल्ली दरबारी वजन दाखवत पुन्हा उमेदवारी मिळवली आणि 1999 आणि 2004 मध्ये खासदार झाले मात्र त्यांच्या निधनानंतर 2006 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉग्रेस पक्षांच्या तिकीटावर प्रकाशबापूंचे पुत्र प्रतिक पाटील लोकसभेत पोहचले. केलेल्या कामाच्या जोरावर प्रतिक पाटील पुन्हा 2009 मध्ये सलग दोनदा सांगलीचं प्रतिनिधीत्व करतायतं.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.  इथल्या  मतदारांनी  नेहमीच  कॉग्रेसच्या हाताला साथ दिली आहे.तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या  स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे या सांगली लोकसभा मतदार संघावर वर्चस्व कायम राहिले आहे. पण विकासाच्या मुद्दावर आणि बदलत्या राजकीय समिकरणामुळे सांगलीकर कुणाला साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
खासदार प्रतिक पाटलांची ओळख
नाव - खा.प्रतिक प्रकाशबापू पाटील
जन्म - 8 सप्टेंबर 1973
वय - 40 वर्षे
शिक्षण - ऑटोमोबाईल इंजिनियर
खा. प्रतिक पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गिय वसंतदादा पाटील यांचे नातू, तर माजी खासदार स्वर्गिय प्रकाशबापू  पाटील  यांचे पुत्र आहेत.  आजोबा आणि वडिलांचा राजकीय वारसाचं प्रतिक पाटील पुढे समर्थपणे चालवतायतं. प्रतिक पाटील हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदही भूषवलं आहे.
  
२००९ साली दुस-यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावर प्रतिक पाटील यांना केंद्रीय  अवजड उद्योग  राज्यमंत्री  बनवण्यात आले,तर नंतर क्रीडा राज्यमंत्री पद त्याना मिळाले. राहूल गांधीच्या किचन कॅबिनेटचे ते सदस्य मानले जातात. 
खा. प्रतिक पाटील यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभे असलेले अजित घोरपडे यांचा पराभव करत सलग दोनदा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलयं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत  माजी मंत्री अजितराव घोरपडे हे कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार होते, पण त्याना राष्ट्रवादीनं पाठबळ दिलं होतं.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना,सुद्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक  नेत्यांनी  अजितराव  घोरपडे  यांचा  उघड  प्रचार  केला  होता. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची झाली होती.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उभे असणारे प्रतिक पाटील यांना 3 लाख 78 हजार 620 मते मिळाली, तर अपक्ष म्हणून उभे असलेले अजितराव घोरपडे यांना 3 लाख 38 हजार 837 मते पडली. तब्बल  39 हजार 787  मतांनी घोरपडेंच